Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

हुंडाबळी एक अनिष्ट प्रथा

हुंडाबळी एक अनिष्ट प्रथा

मालवण येथे जनजागृती कार्यक्रम

मालवण : जिल्हा महिला बालविकास कार्यालय अंतर्गत अभय केंद्र मालवण सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हुंडाबळी एक अनिष्ट प्रथा या विरोधात कै. गंगुबाई कृष्णराव सिताराम देसाई सभागृह मालवण येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती उल्का खोत, संरक्षण अधिकारी अभय केंद्र मालवण श्री.गौरव एखंडे, तसेच वन स्टॉप सेंटरच्या श्रीम.ॲड मीनाक्षी नाईक श्रीम.ॲड नंदिनी मोडकर, निकिता पाटकर , प्राध्यापक श्री.दत्ताराम माळी व इतर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
एडवोकेट मीनाक्षी नाईक यांनी हुंडा प्रतिबंध कायदा १९६१ व पोक्सो ऍक्ट संदर्भात मुलांशी व महिलांची संवाद साधला. त्याचप्रमाणे नंदिनी मोंडकर यांनी मुलांना मोबाईलचे दुष्परिणाम व त्यामुळे वाढती गुन्हेगारी याबाबत मार्गदर्शन केले.
मेघा वजराटकर यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच श्री.ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांनी विधी सेवा समिती अंतर्गत येणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमात शंभर विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्ताविक गौरव एखंडे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. प्रवीण साबळे यांनी केले.

rapan bottom