Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर

बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन

मुंबई : इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याने हे राज्यासाठी मोठे यश असल्याचे विधानपरिषद आमदार श्री. प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून झालेल्या या भव्य गुंतवणुकीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.

विधानभवन, मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानपरिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सत्र पार पडले. या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे विभागात झालेल्या गुंतवणुकीचा विशेष उल्लेख केला. दावोस येथील गुंतवणुकीची चर्चा नेहमीच होते; मात्र इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधून महाराष्ट्रासाठी झालेली ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही राज्याच्या आर्थिक विकासाला नवे बळ देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये गोरेगाव (नेस्को) येथे पार पडलेल्या इंडिया मेरिटाईम समिटमध्ये देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत बंदरे, जलपरिवहन, लॉजिस्टिक्स व किनारपट्टी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंदरे खात्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची आणि गुंतवणुकीची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन केले.

rapan bottom