Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

टोकाची भूमिका नको ; मालवण सीआरझेड नोटीस प्रकरण

टोकाची भूमिका नको ; मालवण सीआरझेड नोटीस प्रकरण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना

आमदार नीलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांची मांडली भूमिका

मालवण किनारपट्टी भागातील जनतेच्या ज्वलंत व प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक

सिंधुदुर्ग–मालवण सह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध

मुंबई ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत. ती नियमित करण्यासाठी कायदेशीर व सकारात्मक प्रस्ताव तयार करा. येथील मच्छीमार बांधवांना विश्वस्त घ्या. जिल्ह्यातील मच्छीमार हा मासेमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा आहे,त्यामुळे प्रशासनाने टोकाची भूमिका न घेता स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय २०१९ सालापूर्वी अस्तित्वात असलेली बांधकामे नियमित करणासाठी हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.बैठकी अंती मालवण तालुक्यातील मच्छीमार हा पारंपरिक आल्याने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे ठरले. मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणार नाही याची काळजी घ्या.कोणालाही नोटीसा न देण्याची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली.आता मंत्री,आमदार हे मच्छीमार समाजाच्या घरचे असल्याने कोणावर अन्याय होऊ नये अशा सूचना यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.



आज मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ मालवणचे आमदार नितेश राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह–मालवण किनारपट्टी भागातील जनतेच्या अत्यंत ज्वलंत असलेल्या सी.आर.झेड.व इतर प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. सीआरझेड क्षेत्रातील ३०० चौ.मी. पर्यंतच्या बांधकामांबाबत दिलासा देणारा निर्णय, तसेच गाबीत समाजाच्या पारंपरिक मच्छीमार वस्त्यांच्या संरक्षणाचा विषय प्राधान्याने चर्चिला गेला. स्थानिकांना न्याय, कायदेशीर संरक्षण आणि स्थैर्य मिळावे यासाठी नियमांच्या चौकटीत ठोस व सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आला. सिंधुदुर्ग–मालवण सह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व जनतेच्या हितासाठी प्रशासन कटिबद्ध असून लवकरच प्रभावी तोडगा निघेल, अशी ग्वाही देण्यात आली.



याप्रसंगी पर्यावरण सचिव सौ. जयश्री भोज, ग्रामविकास विभाग उपसचिव सौ. कविता पोदार, मत्स्य आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी, बंदरे विभाग (CEO) श्री. पी. प्रदीप,सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबूडकर,मालवणच्या प्रांत अधिकारी काळुसे,कणकवली प्रांत अधिकारी काटकर मच्छीमार प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

rapan bottom