Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

मामा वरेरकर नाट्यगृह येथील विहीर परिसरात स्वच्छता मोहीम

मामा वरेरकर नाट्यगृह येथील विहीर परिसरात स्वच्छता मोहीम

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा पुढाकार

मालवण : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह व परिसराची पाहणी दरम्यान नाट्यगृह परिसरातील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचा कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कचरा टाकला जाणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत उपनगराध्यक्ष पाटकर यांनी तत्काळ स्वच्छतेचे काम हाती घेतले. मंगळवारी सकाळी त्यांनी स्वखर्चातून विहिरीतील गाळ व साचलेला कचरा काढून संपूर्ण विहीर स्वच्छ करून घेतला. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ व प्लास्टिकमुळे विहिरीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

भविष्यात पुन्हा कोणीही विहिरीत कचरा टाकू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विहिरीवर ग्रीन मॅट टाकण्यात आले. त्यामुळे विहिरीचे संरक्षण होऊन परिसरातील स्वच्छता अबाधित राहण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी पाटकर यांनी नमूद केले.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या समवेत सुभाष कुमठेकर व सहकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत करत पाटकर यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom