Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची निवड

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची निवड

मालवण | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे. स्वागत यात्रेचे हे 23 वे वर्ष असून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संस्थापक भाऊ सामंत व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत भरड दत्तमंदिर येथे समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी संयोजक प्रशांत हिंदळेकर, बंटी केनवडेकर, भूषण साटम, रत्नाकर कोळंबकर, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, कृष्णा ढोलम, सौगंधराज बादेकर, अरविंद मयेकर, अमृता फाटक, अस्मिता निव्हेकर यांसह अन्य सदस्य उपस्थित होते.

भव्यदिव्य स्वरूपात चित्ररथ आकर्षक चलचित्र देखावे, ढोलपथक, वेशभूषा स्पर्धक आणि तमाम मालवण वासीय यांच्या सहभागातून भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी निघणार आहे. त्या दृष्टीने नियोजन व प्राथमिक चर्चा करण्यात आली असून पुढील महत्वपूर्ण बैठक शुक्रवार 27 फेब्रुवारी सायंकाळी 5 वा. भरड दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने देण्यात आली आहे.

फोटो : अमित खोत

rapan bottom