Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नोकर भरती | उमेदवारांची परिक्षा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नोकर भरती | उमेदवारांची परिक्षा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे. सदरची परिक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती. सदर परीक्षेची तारीख आय.बी.पी.एस कंपनीकडून दि. २८ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

जिल्हा बँकेने आय.बी.पी.एस मार्फत भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणी जाहीर केली होती. परंतु लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून ५०७७ अर्ज प्राप्त झाल्याने पूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या पाच ठिकाणांमध्ये सर्व अर्जदार उमेदवारांची संख्या सामाविष्ट होणे शक्य नसल्याने तसेच आवश्यक त्या प्रमाणात परीक्षा केंद्रांची उपलब्धता नसल्याने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नव्याने आणखी पाच परिक्षा ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता ही परिक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा सांगली, पुणे, मुंबई, म्हपसा, मडगांव, पणजी अशा दहा ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवार यांना त्यांचे हॉल तिकीट बाबतचा मेसेज परिक्षा फॉर्म भरताना नमूद केलेल्या ई-मेल ऍड्रेस वर व फॉर्म फॉर्म मधील नमूद मोबाईल नंबरवर आय.बी.पी.एस कंपनीकडून पाठवण्यात येणार आहे.

परिक्षार्थींचे हॉल तिकीट बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या संकेतस्थळावर आयबीपीएस च्या लिंकवरून दिनांक २३/०२/२०२६पासून उपलब्ध होणार आहे. सदर लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावयाचे आहे.हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह रिपोर्टिंग टाइमिंगच्या पंधरा मिनिटे आधी संबधीत परिक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. तरी उमेदवारांनी आपला इमेल दररोज तपासावा व बँकेच्या संकेतस्थळावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे. सर्व पात्र परिक्षार्थी यांनी वेळेवर परिक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षेस सहभागी व्हावे व उज्वल यश संपादन करावे.

rapan bottom