Thursday, 29 October 2026
Latest News
मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम!
ruchira top

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अभिवादन

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अभिवादन

सिंधुदुर्ग नगरी | जिमाका: मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भवनात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक आणि समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी आपल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून समाजजागृतीची नवी दिशा मिळाली. सत्य, विवेक आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी पत्रकारिता आजही त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेते. लोकशाही बळकट करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्ण आणि जबाबदार पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव बाळ खडपकर, सदस्य संजय वालावलकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवु महाडेश्वर, संदीप गावडे तसेच दत्तप्रसाद वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी जांभेकर यांच्या कार्याचा आदर्श घेत पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

rapan bottom