२३ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम.
मालवण : मालवण धुरीवाडा कुरण येथील श्री स्वामी समर्थ मठात मूर्ती प्रतिष्ठापणे चा एकोणिसावा वर्धापनदिन सोहळा दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण, श्री सत्यदत्ताची महापूजा दुपारी १ ते ४ यावेळेत महाप्रसाद, दुपारी १ पासून तीर्थ प्रसाद, दुपारनंतर त्रिमूर्ती भक्तीसंगम मालवण यांचे गीतगायन, सद्गुरू वामन पै जीवन विद्या मिशन कोळंब यांचा हरिपाठ, श्री सद्गुरू सदानंद माऊली सांप्रदाय भजन मंडळ वायरी मालवण यांचे भजन, मठात दर गुरुवारी दुपारी १२ ते १ आरती तसेच सायंकाळी ७.३० वाजता सामूहिक आरती असते, या कार्यक्रमात सहभागी व्हावे. यावर्षी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव १५ एप्रिल रोजी होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवेकरी धामापूरकर कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
▪️अमित खोत | मालवण

