मालवण : इंटरनॅशनल शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन यांच्यावतीने अंधेरी स्पोर्ट्स शहाजीराजे स्टेडीयम येथे शोतोकान कप ऑल इंडिया नॅशनल कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत किंग स्पोर्ट शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया शाखा मालवण, कट्टा, आचरा सिंधुदुर्ग येथील १४ खेळाडूंची कराटे फाइट व कराटे काता यासाठी निवड झाली होती. या खेळाडूंनी चित्तथरारक फाइट व काता सादरीकरण करून किंग स्पोर्ट शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गला बेस्ट काता व बेस्ट फाइट ट्रॉफी मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली.
या स्पर्धेत ९०० कराटे खेळाडू सहभागी झाले होते. यश प्राप्त केलेल्या खेळाडूंमध्ये जुई गरगटे, गोल्ड मेडल- काता, सानिका गावकर, गोल्ड मेडल-काता, गोल्ड मेडल - फाइट, युती यमकर, गोल्ड मेडल- फाइट, सिल्वर मेडल- काता,अद्वेत नाईक,गोल्ड मेडल-काता, ब्राँझ मेडल-फाइट,स्वरा तळवडकर, गोल्ड मेडल-फाइट,ब्राँझ मेडल-काता, शौर्य जामसंडेकर, सिल्वर मेडल-काता, मानस जुवाटकर,ब्राँझ मेडल-काता, सिल्वर मेडल- फाइट, अधिराज खानोलकर, सिल्वर मेडल-काता, ब्राँझ मेडल-फाइट, दुर्वा हिर्लेकर ,ब्राँझ मेडल-काता, ब्राँझ मेडल - फाइट,गौरांग लुडबे, ब्राँझ मेडल-काता, ब्राँझ मेडल- फाइट, श्लोक चांदरकर, ब्राँझ मेडल - फाइट, दक्ष पटेल, ब्राँझ मेडल-काता, लिसा कुबल, सिल्वर मेडल-काता, वेदान कांदळकर, ब्राँझ मेडल- फाइट,
या सर्व खेळाडूंना किंग स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट व आंतरराष्ट्रीय कोच शिहान विजय केळुसकर फिफ्थ डॅन ब्लॅक बेल्ट देवबाग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सह प्रशिक्षक सानिका गावकर, मृणाल मलये, ओमकार लाड, अँड. श्रावणी केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडू व किंग स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
▪️अमित खोत | मालवण

