Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

बार्टीमार्फत आमदार निलेश राणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट

बार्टीमार्फत आमदार निलेश राणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट


मालवण | प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत महाड येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभेच्या आमदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट स्वरूपात देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मालवण तालुका समतादूत संग्राम कासले यांनी  बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड, सिंधुदुर्ग प्रकल्प अधिकारी विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट दिला.

किल्ले राजकोट येथे छत्रपाती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या पायथ्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आमदार निलेश राणे यांना भेट देण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, अखिलेश शिंदे, पत्रकार अमित खोत कृष्णा ढोलम, आप्पा मालडकर आदी उपस्थित होते. यावेळी तालुका समतादूत संग्राम कासले यांनी आमदार नितेश राणे यांना बार्टीच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.

अमित खोत, मालवण

rapan bottom