मालवण : श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. दांडी मालवण या संस्थेला सन २०२४–२५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या नफ्यातून सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मच्छिमार नेते छोटू सावजी, अखिल महाराष्ट कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मिथुन मालंडकर, श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा अध्यक्ष वसंत गावकर, मच्छिमार नेते प्रदीप मोर्जे, सीमाव रापण संघ देवबाग सदस्य नादार तुळसकर, आबा वाघ तसेच संस्थेचे मच्छिमार सभासद उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष जगदिश एकनाथ खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत विजय जोशी, संचालक प्रविण मेस्त, जीवन भगत, पंकज सादये, मुणाली कोयंडे, रुपेश साळगांवकर, संतोष ढोके, तुषार आचरेकर, रविंद्र चांदेरकर, दिलीप पराडकर, अर्चना आचरेकर, अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव सौ सतेजा वायंगणकर यांनी मानले. मार्च २०२५ पर्यंत झालेल्या सभासदांना भेटवस्तू घेवून जाण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्षांनी केले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत भेटवस्तू वितरण करण्यात येईल. अशी माहिती देण्यात आली.

