Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

पायाला दुखापत झालेल्या गायीला सुरक्षित निवारा

पायाला दुखापत झालेल्या गायीला सुरक्षित निवारा

गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांचा पुढाकार

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात गेले अनेक दिवस पायाला गंभीर दुखापत झालेली गाय बेवारसपणे फिरत होती. याची माहिती मिळताच मालवणमधील गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांनी वैभववाडी खांबाळे येथील गाय वासरू गो शाळेशी संपर्क साधून या गायीची त्याठिकाणी रवानगी केली.

सदरील गो शाळेत जागा उपलब्ध नव्हती. पण या गायीवर उपचार होण्याची गरज निदर्शनास आणून देताच त्यांच्या विनंतीस मान देत या गो शाळेने या गायीला आपल्याकडे आणण्यास होकार दर्शवला. याबद्दल गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांनी गो शाळेचे आभार मानले आहेत.

मालवण मध्ये ही गाय पायाला दुखापत झालेल्या अवस्थेत बरेच दिवस फिरत होती. येथील बाळा सादये यानी या गायीला आपल्याकडे आणत तीन दिवस तिची सेवा केली. डॉक्टर आणून तिच्यावर उपचार केले. तसेच या गायीच्या मालकांशी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, कोणीही पुढे न आल्याने गो सेवक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खांबाळे येथील गाय वासरू गो शाळेचे प्रफुल्ल पवार यांच्याशी संपर्क करून या गायीला आपल्याकडे ठेवण्याची विनंती केली. मात्र त्यांच्या कडे जागा अपुरी असल्याने ही गाय ठेवायची कुठे हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर श्री. पवार यांना विनंती करून या गायीची परिस्थिती त्यांना सांगितली असता त्यांनी या गायीला आपल्याकडे आणण्यास सहमती दिली. अखेर बुधवारी ही गाय खांबाळे येथील गो शाळेत पाठवण्यात आली.

यावेळी तेजस लुडबे, नगरसेवक ललित चव्हाण, निकित वराडकर, अनिश तळगावकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्रीराज बादेकर, दर्पण सादये, अनिकेत तळगावकर, आदित्य लुडबे, वैभव लुडबे, तेजस नार्वेकर, बाळा सादये आदी उपस्थित होते.

अमित खोत, मालवण

rapan bottom