मालवण | प्रतिनिधी : शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मोठया संख्येने शिवभक्त किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले राजकोट येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग किल्ल्या वर जाण्याच्या मार्गातील बंदर जेटी परिसर तसेच राजकोट किल्ला परिसर याठिकाणी मालवण नगरपरिषद माध्यमातून आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीही याठिकाणी येऊन स्वच्छते बाबत कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या.

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने परिसरात विशेष स्वच्छता मोहीम
