Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

हृदयांश चा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यां सोबत साजरा झाला

हृदयांश चा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यां सोबत साजरा झाला


विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

स्काय न्युज टुडे | मालवण : अंगणवाडी, शाळा अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत दरवर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मालवण रेवतळे येथील सौ. अमृता अनिकेत फाटक यांनी मुलगा हृदयांश याचा सातवा वाढदिवस प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवतळे येथे विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. सामाजिक भावनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे ही वितरण यावेळी हृदयांश याच्या हस्ते करण्यात आले.



शिक्षक देविदास प्रभुगांवकर, वर्षा धुरी यांसह उपस्थित विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात हृदयांश याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी हृदयांश याचे वडील आंबा बागायतदार अनिकेत फाटक व आई अमृता फाटक उपस्थित होते.

यावेळी अमृता फाटक म्हणाल्या मुलागा हृदयांश जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण येथे पाहिलीत शिकत आहे. त्याचा वाढदिवस गेली सहा वर्ष आडवण येथे माहेरी असलेल्या अंगणवाडीत मुलांसोबत साजरा केला जातो. यावर्षी त्या अंगणवाडीत तसेच आमच्या रेवतळे प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हृदयांश चा वाढदिवस साजरा करण्यात आला.



अनेक मुलांसोबत वाढदिवस साजरा होत असताना एक वेगळा आनंद मनात निर्माण होतो. सोबतच आपुलकीची भावना निर्माण होते. हीच आपुलकीची भावना हृदयांश च्या मनात निर्माण व्हावी. सोबतच जे शालेय साहित्य वितरण होते त्यातून दातृत्व भावना हृदयांश च्या मनात निर्माण व्हावी. या सामाजिक भावानेतून अंगणवाडी, शाळा अश्या विविध ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो असे अमृता फाटक यांनी सांगितले. फाटक कुटुंबियांच्या सामाजिक भावनेचे कौतुक करण्यात आले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom