जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीने मालवण तालुक्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विजय मिळवला. मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजप महायुतीच्या सौ. क्षमा संदीप या विजयी झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मसुरे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या करणार आहेत.
मसुरे मर्डे टोकळवाडी येथील क्षमा हडकर यांचे माहेरचे नाव सुवर्णा नारायण गावडे. कापड दुकान व्यवसायाच्या निमित्ताने सर्वांच्या परिचित असे हे व्यक्तिमत्व गावात स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिला वर्गामध्ये कार्यरत आहेत.

पती संदीप हडकर यांनी दोन वेळा मसुरे गावचे सरपंच पद भूषवले असल्याने त्यांच्या कामाचा अनुभवाचा फायदा क्षमा हडकर यांना निश्चितच होणार आहे. जनतेचे प्रश्न जाणून घेत ते सोडवणे मतदार संघातील समस्यांचे निराकरण करणे तसेच विकासकामे यालाच सर्वाधिक प्राधान्य राहणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे सरकार आहे. विकास गतिमान रित्या होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार नारायण राणे साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर तसेच वरिष्ठ नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक विकास निधीतुन मतदार संघाचा सर्वांगीण विकास साध्य केला जाईल. जनहिताच्या योजना अगदी तळागळापर्यत पोहचवणे, जनतेला अधिकाधिक लाभ मिळवून देणे यावर प्रमुख लक्ष राहील. जनतेच्या मागणीनुसार अपेक्षित विकास हेच आपले लक्ष राहील. असे क्षमा हडकर सांगतात.
मतदार संघातील तमाम जनतेच्या मतदान रुपी आशीर्वादाने मी जिल्हा परिषद सदस्य झाले. माझे पद हे जनतेला समर्पित आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून मसुरे मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.
सर्व मतदार, ग्रामस्थ तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार...!
▪️सौ. क्षमा संदीप हडकर
जिल्हापरिषद सदस्य, मसुरे


