Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

मुंबईत कोकणवासीयांना हक्काचे कोकण भवन

मुंबईत कोकणवासीयांना हक्काचे कोकण भवन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी

महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी मुंबईच्या महापौर पदावर निवड झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांचे अभिनंदनही केले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईच्या जडणघडणीत व दैदीप्यमान वाटचालीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. मुंबई आणि कोकणी माणूस हे एक अतूट समीकरण असून आज मुंबईत वास्तव्यास असलेला मोठा वर्ग हा मूळचा कोकणातील आहे.

कोकणातील नागरिकांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असल्याने कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण, वैद्यकीय उपचार व रोजगारासाठी मुंबईत येत असतात. मात्र मुंबईत येणाऱ्या कोकणवासीयांसाठी आजतागायत कोणताही हक्काचा निवारा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले आहे.

कोकणातील कला, साहित्य, इतिहास व सामाजिक उपक्रमांचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक कला-केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईत उच्च शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी येणाऱ्या कोकणवासीयांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

rapan bottom