Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सुविधा

बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सुविधा

मालवण : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा अंतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी 17 फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत स्वयंअर्थसहायित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 25% राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावीत बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा वंचित घटकात तर आर्थिक वर्षात पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई संकेतस्थळावर दिसतील. त्यामधील शाळांची निवड करावी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
बार्टी मार्फत मोफत फॉर्म भरण्याची सोय सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांचे फॉर्म विनामूल्य भरण्यात येणार आहेत ज्या पालकांना आरटीई प्रवेशाचे फॉर्म विनामूल्य भरायचे आहेत त्यांनी तालुक्यातील समतादुतांशी संपर्क साधावा. असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभागीय प्रकल्प अधिकारी तेजस्विनी सोनवणे यांनी केले आहे

विजय कदम (प्र. अधिकारी ) 9119570426, संग्राम कासले.मालवण 9420824874,सुदीप कांबळे.देवगड 9960803301,राजू दिनदयाळ.वैभववाडी 9421235704,सुजित जाधव.वेंगुर्ले, 9422921882,सुहास मोचेमाडकर.दोडामार्ग,8805269145,सगुण जाधव.सावंतवाडी 7066409995

rapan bottom