Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

मालवण किनाऱ्यावर दुर्मीळ दृश्य!

मालवण किनाऱ्यावर दुर्मीळ दृश्य!


70 ते 75 डॉल्फिनचा समुह कॅमेरात कैद

मालवण | प्रतिनिधी : पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या मालवण किनाऱ्यावर एकाच वेळी सुमारे 70 ते 75 डॉल्फिनचा समुह (कळप) दिसल्याची दुर्मिळ घटना कॅमेरात कैद झाली आहे.
पर्यटकांसह स्थानिकांसाठी हे अत्यंत दुर्मीळ दृश्य ठरले आहे.

मालवण तारकर्ली–देवबाग समुद्रपट्ट्यात डॉल्फिनचे दर्शन अनेकवेळा घडत असले, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने कळप एकत्र फिरताना प्रथमच स्पष्टपणे दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी या कळपाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपले. शांत लाटांमध्ये समांतर हालचाली करत, अधूनमधून पाण्याबाहेर उड्या मारत पुढे सरकणाऱ्या डॉल्फिनमुळे समुद्रकिनारा काही काळ मंत्रमुग्ध झाला. स्थानिक मच्छीमार आणि बोटचालकांनीही या हालचालींची पुष्टी केली असून, समुद्रातील जैवविविधतेसाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.

भावे म्हणाले, या परिसरात आढळणाऱ्या इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन सहसा कळपाने फिरतात आणि किनारपट्टीलगतच्या उथळ पाण्यात खाद्य शोधतात. हवामानातील स्थिरता, पाण्याची गुणवत्ता आणि मासळीची उपलब्धता या घटकांमुळे मोठे कळप एकत्र दिसू शकतात. सिंधुदुर्गसह रत्नागिरी सागरी परिक्षेत्र हे या प्रजातीसाठी महत्त्वाचे अधिवास मानले जातात.

मालवण–तारकर्ली पट्टा स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग आणि डॉल्फिन सफारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यात इतक्या मोठ्या कळपाच्या दर्शनामुळे पर्यटकांचे आकर्षण अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याठिकाणी बोटींचा वेग नियंत्रित ठेवणे, कळपापासून सुरक्षित अंतर राखणे आणि आवाज प्रदूषण टाळणे यांसारख्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून डॉल्फिनच्या नैसर्गिक वर्तनात व्यत्यय येऊ नये. स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींच्या मते, अशा नोंदींमुळे किनारपट्टीवरील सागरी संवर्धनाच्या प्रयत्नांना बळ मिळते. भविष्यात नियमित मॉनिटरिंग, जनजागृती आणि जबाबदार पर्यटन यांवर भर दिल्यास सिंधुदुर्गच्या समुद्रसंपदेचे दीर्घकालीन संरक्षण शक्य होईल.


सिंधुदुर्गच्या किनारपट्टीत आढळणारी इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फीन (वैज्ञानिक नाव Sousa plumbea) ही किनारपट्टीलगतच्या उथळ, गढूळ आणि पोषकतत्त्वांनी समृद्ध पाण्यात राहण्यास अनुकूलित प्रजाती आहे. या डॉल्फिन साधारणतः 5–30 मीटर खोलीच्या परिसरात, खाडीमुख (estuaries), मॅन्ग्रोव्ह पट्टे, वाळूचे उथळ बार आणि प्रवाळभित्तींच्या आसपास खाद्य शोधताना दिसतात. त्यांचे सामाजिक वर्तन कळपाधारित असून इकोलोकेशनच्या साहाय्याने त्या मासे व क्रस्टेशियन्सचा शोध घेतात. सिंधुदुर्ग परिसरात तुलनेने कमी औद्योगिक दाब, समृद्ध मासेमारी संसाधने आणि खाडी–मॅन्ग्रोव्ह अधिवास यांमुळे या प्रजातीस अनुकूल पर्यावरण उपलब्ध आहे.

rapan bottom