तपासणीत शंकांचे निरसन झाले ; मालवण उपविभाग उपकार्यकारी अभियंता यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर येथील कमलाकर खोत यांनी स्मार्ट मीटर विरोधात 15 ऑगस्ट रोजी उपोषण केले होते. आपल्याला विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लावण्यात आला व मीटर फास्ट पळतोय हा मीटर आपल्याला नकोच अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचाच आणलेला डिजिटल मीटर सीरिज ला लावण्यात आला व त्यांना टेस्टिंग करून दाखविण्यात आले. यामध्ये वापराच्या नोंदी मध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. त्यामुळे कमलाकर खोत आता समाधानी आहेत. त्यांनी आपल्या बाजूच्या भावूबंधूचे ही स्मार्ट मीटर लावून घेतले. यावेळी मालवण उपविभाग चे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी याबाबत माहिती दिली.

स्मार्ट मिटर योग्य असल्याचे स्पष्ट
