Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

अक्षतांची पुजा ठरली लक्षवेधी!

अक्षतांची पुजा ठरली लक्षवेधी!

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त सोहळा

मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त श्री देव रामेश्वराच्या पिंडी भोवती १५ थरांची अक्षतांची (तांदळाची) महापूजा बांधण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात विशेष प्रकारची ही तांदळाची महापूजा पहावयास मालवण देऊळवाडा येथील श्री रामेश्वर मंदिरातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती.

मालवण देऊळवाडा येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत पुराण वाचन, कीर्तन, पालखी मिरवणूक असे अनेक धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. या सर्व कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे रविवारी महाशिवरात्री दिवशी रात्री ११ ते १२ या वेळेत गाभाऱ्या तील शंकराच्या पिंडीभोवती बांधण्यात आलेली १५ थरांची तांदळाची महापूजा लक्षवेधी ठरली.

पूर्वीच्या काळी हि महापूजा बांधण्या करिता पिंडीभोवती माडाच्या झावळाच्या पाती(चुड्तीचा) उपयोग केला जात असे. पण काही वेळा तांदळाच्या वजनाने या पाती ची रिंग तुटत असल्याने महापूजा बांधण्यात अडचण निर्माण होत असे त्यामुळे अलीकडच्या काळात पाती च्या रिंगाऐवजी सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या रिंगा वापरून अतिशय आकर्षक महापूजा महाशिवरात्री ला बांधण्यात येते.

या महापुजे मध्ये तांदळाचे एकावर एक असे १५ थर असतात. प्रत्येक थरावर बेलपत्र व शेवटच्या थरावर सोन्याचे पान ठेऊन ही महापूजा सजवली जाते. ही अक्षताची पूजा पाहण्यासाठी आणि ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाचे आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. रात्रौ मंदिर सभोवताली पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला या वेळी मोठ्या संख्ये ने भाविक उपस्थित होते.

फोटो: मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाच्या शिव पिंडीवर महाशिवरात्री निमित्त अक्षता (तांदूळ) पूजा बांधण्यात आली. ( गणेश गांवकर, मालवण)

rapan bottom