Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सिंधुदुर्गात भव्य नाट्य-सांस्कृतिक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सिंधुदुर्गात भव्य नाट्य-सांस्कृतिक सोहळा

१८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश

सिंधुदुर्ग नगरी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि अद्वितीय कार्यकर्तृत्वावर आधारित हा दोन दिवसीय सोहळा १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी कणकवली व सावंतवाडी येथे रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आचरेकर प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान सभा सदस्य दीपक केसरकर तसेच निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिला दिवस : ऐतिहासिक नाट्यप्रयोग -कणकवली दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आचरेकर प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे शिवचरित्रावर आधारित विशेष नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाट्यप्रयोगातून महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेची धडपड आणि त्यांच्या नेतृत्वगुणांचा प्रभावी आढावा रंगमंचावर साकारला जाणार आहे.
दुसरा दिवस : सांस्कृतिक अभिवादन - सावंतवाडी दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे महाराजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. पोवाडे, नृत्यनाट्य आणि ऐतिहासिक सादरीकरणांद्वारे शिवचरित्र उजळवले जाणार आहे. दोन्ही कार्यक्रमांचा कालावधी सुमारे दोन ते अडीच तासांचा असून, प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

rapan bottom