Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

वराडकर हायस्कुलमध्ये २० रोजी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा

वराडकर हायस्कुलमध्ये २० रोजी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा

४३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघाची होणार निवड चाचणी

मालवण | प्रतिनिधी : दि अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने १८ वर्षाखालील मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा स्पर्धा रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी वराडकर हायस्कूल, कट्टा तालुका मालवण येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ २७ ते ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे .

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या स्पर्धेसाठी वयोमर्यादा १८ वर्षाखालील असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्लब, शाळा, संस्था आदी सर्वांना प्रवेश मिळेल. स्पर्धा प्रवेश फी रु. १००/- व २०२४-२५ संघ नोंदणी फी रु. ३००/- भरणे अनिवार्य आहे. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाने अधिक माहितीसाठी व आपला प्रवेश अर्ज दि. १८ ऑक्टोबर पर्यंत सचिव संजय पेंडूरकर मोबा नंबर ९४२२३९२७९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

rapan bottom