Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

भंडारी समाजासाठी 'त्यांनी' आश्वासना व्यतिरिक्त काय केले ?

भंडारी समाजासाठी 'त्यांनी' आश्वासना व्यतिरिक्त काय केले ?

मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल

निलेश जोशी | कुडाळ : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच काही तथाकथित समाज पुढाऱ्यांना हाताशी धरून फसव्या घोषणा आणि आमिष दाखवून भंडारी समाजाकडे मतांचा जोगवा मागण्याचे धंदे सुरू आहेत. भंडारी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आश्वासनांव्यतिरिक्त प्रत्यक्षात काय काम केले ते समोरासमोर जाहीर करावे असे आव्हान मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिले आहे.


केली पंधरा वर्षापासून विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघात असलेली भंडारी समाजाची मतांची ताकद लक्षात येते आणि याचा फायदा निवडणुकीत मिळावा यासाठी कोणा एका आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला समाज पुढारी म्हणून पुढे करत भंडारी समाज आपल्या दावणीला बांधल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

2019 च्या तत्कालीन सिंधुदुर्ग पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत केसरकरांनी कुडाळ तहसीलदार परिसरात शासकीय जमिनीत आपल्या तत्कालीन शिवसेना पक्षातील पक्षातील काही भंडारी समाज्याच्या त्या वेळच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भंडारी समाज भवनासाठी जागेच्या केलेल्या पाहणी नाट्याच काय झालं हे जाहीर करावे.


भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांच्याकडे विनंती वजा मागणी आहे की, अशा पद्धतीने जो कोणी महासंघाच्या कार्यकारणीवर नसताना तसेच भंडारी समाजकार्यात आपले कोणतेही योगदान नसताना केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी तसेच आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी समाजाची भूमिका चुकीच्या पद्धतीने ठरवत असेल, तर त्याला वेळीच आवर घालावा असेही श्री. किनळेकर यांनी म्हटले आहे.

rapan bottom