Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

भंडारी भवनला जागा उपलब्ध

भंडारी भवनला जागा उपलब्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांचे रुपेश पावसकर यांनी मानले आभार

निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री (मुंबई पालकमंत्री) दिपक केसरकर यांनी भंडारी समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री दीपक केसरकर हे व्हिजन असणारे नेते असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही नेत्यांनी भंडारी समाजाचे प्रेरणास्थान असलेले भागोजी कीर यांचे स्मारक उभारणीसाठी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाला जागा उपलब्ध करून देऊन एकनाथ शिंदे, आणि दीपक केसरकर यांनी भंडारी समाजाप्रती आपण सदैव पाठीशी असल्याची खात्री या दोन्ही नेत्यांनी दिली.


या स्मारकासाठी रुपये २० कोटी व लागणारी जागा मंजूर करून या कामाचा भूमिपूजन सोहळा दि.१३ मार्च २०२४ रोजी पार पडला होता. यावेळी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे आभासी दृष्याद्वारे उपस्थित होते, तर दिपक केसरकर,शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा(मुंबई पालकमंत्री) हे मैत्र जीवांचे कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. हे मंजूर करण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे देखील विशेष कौतुक करण्यात आले.

rapan bottom