आचरा येथील घटनेने खळबळ
आचरा : आचरा येथे एका सोन्याच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघा चोरट्यानी दुकानातील सुमारे दोन ते अडीज लाख किमतीचे दागिने घेऊन पळ काढला. बुधवारी दोघे चोरटे मोटरसायकल वरून आले होते. अशी माहिती मिळाली असून चोरटे सिसिटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले असून त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. चोरटे मालवणच्या दिशेने गेले अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरु असल्याची माहिती आचरा येथील विजय (बाबू) कदम यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त
आचरा बाजारपेठेतील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोने खरेदी करण्याचा बहाणा करत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यानी काउंटरवरील ठेवलेला सोन्याच्या दागिन्याचा पाऊच लांपास करत चोरी केली आहे. ही घटना सायंकाळी 4.30 च्या दरम्यान घडली काऊंटर असलेला पाऊच गायब झाला असल्याचे दुकान मालक अरुण कारेकर यांच्या काहीवेळाने लक्षात येताच बाजूच्या व्यापाऱ्यांना सांगत पोलिसांना खबर दिली सदर अज्ञात चोरटे आचरा बाजारातील काही दुकानाच्या व आचरा तिठा येतील रस्त्यावर लावण्यात आलेल्या cctv दिसून आले आहेत. सदर घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम आचरा पोलीस ठाण्यात चालू होते.
आचरा बाजारपेठ येथील अरुण गणेश कारेकर यांच्या साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात सायंकाळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले यावेळी दुकान मालक कारेकर यांनी त्याना काही दागिने दाखवले परंतु दागिने पसंत नसल्याचे सांगत दुकानातुन गोल 30 रुपयाचा तावीज खरेदी केला व लागलीच दुचाकीवर आचरा तिथ्याच्या दिशेने निघून गेलेत कारेकर हे दाखवलेले दागिने पुन्हा आत ठेवत असताना काउंटरवर असलेला सोन्याचे 8 मणी, सोन्याची 12 डावली, सोन्याचे 1 पेंडल असे 20 ग्राम वाजणाचे दागिने असलेला पाऊच गायब असल्याचे लक्षात आले सुमारे सवादोन लाख रुपयाचे दागिने असल्याची माहिती कारेकर यांनी दिली.
आचरा बाजारपेठेत दागिने लांपास करून दुचाकीवरून निघून गेलेले अज्ञात दोन इसम हे CCTV मध्ये कैद झाले आहेत आचरा पोलिसाचे आचरा तिठ्यावर असलेल्या कॅमेऱ्यात हे अज्ञात चोरटे कणकवली वरून आचरापेठेत दिसून आले आहेत तसेच आचरा बाजारपेठेतील एका भुषारी दुकानात चढून काही वस्तू खरेदी करताना हे चोरटे त्या दुकानाच्या CCTV मध्ये दिसून आले त्यानंतर ते कारेकर यांच्या दुकानात प्रवेश करताना दिसून आलेत. कारेकर यांच्या दुकानातून बाहेर पडत हे चोरटे मालवणच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. CCTV त दोन्ही इसम स्पष्ट दिसत असून निळ्या रंगाची Honda कंपनीची SP शाईन दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

