आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर
विभाग प्रमुख समीर लब्दे यांची माहिती
आचरा : त्रिंबक मुख्य रस्ता ते लोके घर जाणारी पायवाट या विकास कामासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून 3 लाख निधी मंजूर झाला. या विकास कामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी जेष्ठ शिवसैनिक पांडुरंग लोके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक पप्पु परुळेकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, त्रिंबक शाखा प्रमुख संतोष घाडीगांवकर, उपशाखा प्रमुख हरी साटम, त्रिंबक ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण, दाजी भाटकर, संदेश रावले, पांडुरंग लोके, संतोष घाडीगावकर, अरविंद साटम, हरी भाटकर, सागर चव्हाण, अनिल चव्हाण, संतोष सावंत, विलास लोके, संदेश रावले, शंकर सावंत, रमेश साटम, रमेश सावंत, निलेश लोके, अशोक बागवे आदी उपस्थित होते.. अशी माहिती समीर लब्दे यांनी दिली.

