चौके : भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का खंडू शिंदे या विद्यार्थिनीची 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला क्रीडा शिक्षक श्री अनिल आचरेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अनुष्काच्या या यशाबद्दल स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रसिका गोसावी मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विभाग स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

अनुष्का शिंदे हिची विभाग स्तरावर निवड
