भाऊ भोगले | बागायत : भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण ची इयत्ता दहावी (अ) मध्ये शिकत असलेली कु. पूर्वा दत्तात्रय बांदकर हिची राज्यस्तरावर कबड्डीकरिता निवड झाली आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही एकमेव मुलगी आहे हे विशेष! आज सकाळी तिचा भंडारी हायस्कूलमध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे कार्याध्यक्ष श्री सुधीर हेरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हणमंत तिवले ,ज्येष्ठ शिक्षक श्री आर . डी.बनसोडे,ग्रंथपाल श्री प्रफुल्ल देसाई पालक श्री दत्तात्रय बांदकर तसेच विद्यार्थी उपस्थित होता सदर सामने तालुका ,क्रीडा संकुल, कोचरी ठाणे a(पूर्व )येथे 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या काळात होणार आहेत
कु. पूर्वा बांदकर हिला प्रशाळेचे क्रीडा शिक्षक आर बी देसाई तसेच प्रशिक्षक श्री मनोहर साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले

