Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम

पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम

जागतिक महिला दिन निमित्त मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजन

महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांची माहिती

मालवण : जागतिक महिला दिन मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह पटांगण येथे ८ मार्च रोजी विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे. नाचणी पासून बनवलेले पदार्थ पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. मालवण शहरातील मर्यादित महीला व मुलींकरिता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. (नाचणी पासून बनवण्यात येणारे पदार्थ) प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या २५ महिलांना स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.

विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच मालवण शहर मर्यादित महीला व मुलींकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मालवण नगरपरिषदच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणार आहेत. तरी पाक कला स्पर्धा नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक- ९५४५७२८८०२ श्री. खेमराज सावंत. यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

rapan bottom