Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा- मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा- मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती

अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे निर्यात व्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राशी समन्वय; मंत्री नितेश राणे

मुंबई : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला.

विधानसभेत ज्येष्ठ सदस्य श्री.नाना पटोले यांनी जेएनपीए (JNPA) बंदरात राज्यातील फळे व भाज्यांनी भरलेले निर्यात कंटेनर अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची शक्यता निर्माण झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आंतरराष्ट्रीय तणावामुळे निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.नितेश राणे म्हणाले की, "सद्यस्थितीची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली असून केंद्र सरकारशी समन्वय सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री श्री.सर्बानंद सोनोवाल यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. निर्यात साखळी सुरळीत राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आवश्यक ते निर्णय तातडीने घेतले जातील,” असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.

राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून निर्यातदार, शेतकरी व संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

rapan bottom