Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

मुंबई विजयदुर्ग सागरी रो रो ला दापोलीत थांबा मिळावा;गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्री नितेश राणेंकडे मागणी

मुंबई विजयदुर्ग सागरी रो रो ला दापोलीत थांबा मिळावा;गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्री नितेश राणेंकडे मागणी

मुंबई | प्रतिनिधी : मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू केली आहे.ही सेवा मुंबई ते विजयदुर्ग व विजयदुर्ग ते मुंबई अशी थेट असल्याने याचा फायदा दापोली वासियांना व्हावा यासाठी हर्णे बंदरात या रो रो ला थांबा देण्याची मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.मंत्रालयातील मंत्री नितेश राणे यांच्या दालनात भेट घेत त्यांनी ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

एक मार्च पासून मुंबई-तळकोकण रो-रो बोटसेवा थाटामाटात मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.कोकणवासीयांनी दोन दिवसात या नवीन जलप्रवासाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ही या जलसेवेचा उपयोग व्हावा यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही मागणी केली आहे.यावेळी पदुमचे सचिव एन रामास्वामी ,मत्स्य आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.

सदरची ही सेवा मुंबई ते कोकण प्रवासासाठी अतिजलद वाहतुकीचा पर्याय ठरणार असून यामुळे सागरी दळणवळण सुकर होणार असल्याचे मंत्री कदम यांनी निवेदनात नमूद करून हर्णे बंदर येथे सद्यस्थितीत जेट्टीचे बांधकाम सुरू असल्याचे म्हंटले आहे.तसेच कोकणातील दापोली तालुक्यात प्रवासासाठी रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने प्रवाशांना सागरी मार्गाने प्रवास करावा लागतो.त्यामुळे हर्णे बंदर येथे रो-रो सेवेचा थांबा दिल्यास सागरी दळणवळणास अधिक चालना मिळेल असे ही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केल आहे.

rapan bottom