मालवण : कांदळगाव श्री देव रामेश्वर पंचायतन मधील देवस्थानांपैकी एक असलेल्या महान गावातील श्री देव गांगेश्वर यांचे वारेसुत्र असलेले आणि महान घाडीवाडी येथील रहिवासी दत्ताराम पांडुरंग घाडी उर्फ बाबू घाडी (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सायंकाळी निधन झाले.

दत्ताराम घाडी हे गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आल्यावर ते महान गावी परतले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. बाबु घाडी हे महान गावचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वराचे संचार-वारेसुत्र होते. महान-कांदळगांव व मालवण पंचक्रोशीत देवबाबु म्हणुन त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

