मंगेश नलावडे | मालवण : होळी धुलीवंदन मालवण तालुक्यात पारंपारिक रुढी परंपरा जपत मोठ्या आनंदोत्सवात साजरा केला जात आहे. दरम्यान, मालवण तालुक्यात ठिकठिकाणी होळी धुलीवंदन धूम पहावयास मिळत आहे. होळी सणाच्या निमित्ताने गावो गावी आपल्या रूढी परंपरा जपत गाव देवतेचे होळी चे मांड सजविले जातात ल. यात विविध पारंपरिक वाद्य घुमट वाद्याचा वापर करून सुरेल अशी देव भक्ती ची गाणी आणि कोळीण नृत्य सादर करून मांड सजतात. तालुक्यात प्रत्येक गावो गावी प्रथा जोपासली जाते. काही ठिकाणी पाच दिवस तर काही ठिकाणी सात दिवस होळी मांड उत्सव साजरा केला जातो.



मालवण तालुक्यात सार्वजनिक व खाजगी अश्या शेकडो होळी गावा गावात रात्रौ उभारून मोठ्या उत्साहात होळी उत्सव , मांड उसत्व साजरा करण्यात आला. धुलीवंदन निमित्त ठिकठिकाणी युवा तरुणाईचे गट रंगपंचमीचा खेळ खेळताना दिसून येत होती. मालवण शहरातील श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी मंदिर परिसरात होळी धुलीवंदन उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध शर्यतीचे व शक्तिप्रदर्शनाचे खेळही खेळण्यात आले. तर रंगाची उधळण करीत युवावर्ग तरुण तरुणाई बेधुंद झाले होते. बच्चे कंपनी देखील या रंगोत्सवात बेधुंद होऊन तालावर नाचत धुलीवंदन उत्सवाची मज्जा घेताना दिसत होती.



किल्ले सिंधुदुर्गावरही होळीसण….!
ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरही शिवकालीन परंपरा जपत होळी उत्सव साजरा करण्यात आला. किल्ले रहिवाशांच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शिवकालीन प्रथेनुसार श्री शिवराजेश्वर मंदिरातील राजदंड घेवून मालवण तालुक्यातील न्हिवे या गावातून होळी चे झाड पायी चालत आणली. रात्री किल्ले सिंधुदुर्ग वर होळी आणण्यात आली. रात्री समस्त किल्ले रहिवाशांनी जमून होळीचे पूजन करून मोठ्या उत्साहात शिवकालीन होळी उत्सव साजरा केला.


▪️छायाचित्र : गणेश गांवकर, मालवण

