Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

पालकमंत्री नितेश राणे यांच्या यशस्वी प्रयत्नातून रोरो बोट सेवेचे स्वप्न साकार!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या यशस्वी प्रयत्नातून रोरो बोट सेवेचे स्वप्न साकार!

मंत्री नितेश राणे यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या वतीने सत्कार

मालवण | प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बहूप्रतीक्षित मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा सुरु झाली आहे. या बोटसेवेमुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोकणच्या पर्यटनाला ही अधिक चालना मिळणार आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी बोट प्रवासा दरम्यान मंत्री नितेश राणे यांचा सत्कार केला.

कोकण बोटसेवा सुरु व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मार्गी लागली आहे. पूर्वीच्या काळी बोट वाहतूक हेच कोकणच्या दळण वळणाचे मुख्य साधन होते. त्यावेळी मालवण, देवगड आणि वेंगुर्ला बंदरात आर्थिक सुबत्ता होती. मात्र जल वाहतूक बंद पडली. कोकणचे सुपुत्र मंत्री नितेश नारायणराव राणे यांना बंदर मंत्रालयाचा कार्यभार मिळाल्यानंतर कोकण ते मुंबई बोट सेवा सुरु करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही बोट सेवा सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नामुळे कोकण वासियांचे स्वप्न साकार झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी कोकण बोट फेरीच्या शुभारंभावेळी मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, योगेश चांदोसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे यांनी विशेष प्रयत्नातून ही बोट सुरु केली. ही बाब आम्हाला जिल्हा वासियांना अभिमानाची आहे. ही सेवा अशीच सुरु राहावी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर तिचा विस्तार व्हावा. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. त्यामुळे देशी, विदेशी पर्यटक इकडे दाखल होत असून ही बोटसेवा अशीच सुरु राहून संपूर्ण जिल्हावासियांना या सेवेचा लाभ होऊन येथील पर्यटनाचा फायदा होण्यासाठी टप्प्या टप्प्याने मालवण, देवगड, वेंगुर्ला येथ पर्यंत बोट सेवा विस्तारित करण्यासाठी जिल्हा वासियांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना लवकरच निवेदन सादर करणार असल्याचे ते म्हणाले.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom