Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मालवण शहरातील रस्त्यांची केली पाहाणी

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मालवण शहरातील रस्त्यांची केली पाहाणी


रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी-गवत कटाई जलद गतीने पूर्ण करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामांचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रशासनास दिल्या सूचना

मालवण | प्रतिनिधी :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख रस्ते व आगमन मार्गांची पाहणी करण्यात आली.रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी-गवत कटाई काम जलदगतीने पुर्ण करून रस्ते सुसज्ज करा. अश्या सूचना प्रशासनास दिल्या.

या पाहणी दौऱ्यातनगराध्यक्ष ममता वराडकर यांसह मुख्याधिकारी प्रतिक शोरात, नगरसेवक ललित चव्हाण यांच्यासह नगरपरिषद अभियंता व मुकादम उपस्थित होते.
गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील प्रमुख रस्ते तसेच आगमन मार्गांची पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्यांवर पडलेले खड्डे निदर्शनास आले. हे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत कापून रस्ते पूर्णपणे स्वच्छ करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top