शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे यांनी मानले आभार
मालवण : आचरा जिल्हा परिषद विभागातील विविध विकासकामांसाठी जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत एकूण ₹५० लाखांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
मंजूर निधीतून आचरा जि. प. विभागातील पुढील १० विकासकामे मार्गी लागणार आहेत. 1. त्रिबक आरेकरवाडी मळ्याकडे जाणारा पायवाट तयार करणे — ₹५ लाख, 2. वायंगणी पाटवाडी ते भटवाडी रस्ता डांबरीकरण करणे — ₹५ लाख. 3. वायंगणी नाका ते पाठवाडी रस्ता डांबरीकरण करणे — ₹५ लाख. 4. पळसंबं गावठाणवाडी गोलतकर घर ते साकवापर्यंत जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे — ₹५ लाख. 5. बांदिवडे पावणाई मंदिर ते रायकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे — ₹५ लाख. 6. चिंदर बाजारपेठ नागोचीवाडी स्मशानशेड बांधकाम करणे — ₹५ लाख. 7. आचरा बंदर मुख्य रस्ता ते मेराशेवाडी मार्गावरून मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे — ₹५ लाख. 8. आचरा पारवाडी सारमघर ते शिरसेकरघर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे — ₹५ लाख. 9. आचरा ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत सुशोभीकरण करणे — ₹५ लाख. 10. आचरा मच्छी मार्केट इमारत दुरुस्ती करणे — ₹५ लाख. अश्या एकूण १० विकासकामांसाठी ₹५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
आचरा जि. प. विभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि रस्ते विकासाला प्राधान्य देत हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार श्री. निलेश राणे यांचे विभागप्रमुख संतोष कोदे यांनी विशेष आभार मानले आहेत. विकास कामे मंजूर होत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख विनायक बाईत व जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांचाही पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला असेही संतोष कोदे यांनी सांगितले.
“आचरा विभागाच्या विकासासाठी भविष्यातही आवश्यक तो पाठपुरावा करून जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असा विश्वासही श्री. संतोष कोदे यांनी व्यक्त केला.
▪️अमित खोत, मालवण

आचरा जि. प. विभागासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनसुविधा व नागरी सुविधेतून ५० लाखांची विकासकामे मंजूर
