रेकोबा हायस्कूल येथील शिक्षकांचा केला सन्मान : हायस्कूल व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना केले खाऊ वाटप
मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मालवणच्या वतीने शिक्षक दिन साजरा करताना रेकोबा हायस्कूल येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी हायस्कूल व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभूलकर, जयश्री हडकर, राजा शंकरदास, शांती पटेल,मनाली दळवी ,मिताली मोंडकर, उमेश शिरोडकर यांच्या उपस्थितीत रेकोबा हायस्कुल मुख्याध्यापक संजय खोचरे, यांसह शिक्षक श्री. फणसेकर, श्री. कोरे, श्री. कुबल, सौ. मिताली मोंडकर, सौ. रोहिणी दिघे, सौ. अदिती शेर्लेकर, श्री. डगरे, यांसह श्री. दत्ता गोसावी, श्री. यशवंत गांवकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लायन्स क्लब च्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी हायस्कूल व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लब च्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
▪️अमित खोत, मालवण

लायन्स क्लब मालवणच्या वतीने शिक्षक दिन साजरा
