Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवणात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

मालवणात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह


मंदिरे, शाळा-महाविद्यालये व अनेक घरात भक्तिमय सोहळा

फुगड्या, गौळण व भजनांनी रंगत

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर व तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहर व ग्रामीण भागातील विविध मंदिरे, शाळा-महाविद्यालये तसेच घरांमध्ये श्रीकृष्ण मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले.

जन्माष्टमीनिमित्त विविध मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदुंगाच्या साथीने श्रीकृष्ण नामाचा जयघोष, आरती तसेच सुस्वर भजनांच्या माध्यमातून भाविकांनी संगीत सेवा अर्पण केली. त्यामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
शाळा-महाविद्यालयांमध्येही जन्माष्टमीचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थिनींनी पारंपरिक फुगड्या व गौळणी नृत्य सादर करून उत्सवात विशेष रंगत आणली. श्रीकृष्णाच्या गाण्यांसह नामघोषाने शाळा-महाविद्यालयांचे परिसर दुमदुमून गेले.
मालवण शहरातील टोपिवाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच वायरी येथील रेकोबा हायस्कूल यांसह विविध शाळांमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, भजन, गौळणी, फुगड्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातही गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक गौळणी नृत्य सादर केले. तसेच श्रीकृष्णाची आरती करण्यात आली. यावेळी ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्रा. पवन बांदेकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

ruchira top