Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

४० पट नजराणा आकारणीची तरतूद वगळण्यात आल्याबाबत विशेष मोहिम...

४० पट नजराणा आकारणीची तरतूद वगळण्यात आल्याबाबत विशेष मोहिम...

​सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्‍यातील सर्व संबंधित नागरिक, जमीनधारक, कुळ व लाभार्थी यांना याद्वारे जाहीर करण्यात येते की, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ४३ च्या पोटकलम (१) मधील दुसऱ्या परंतुकाखालील खंड (क), हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५० चे कलम ५०-ब मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८ चे कलम ५७ मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) वगळण्यात आलेले आहेत.

​त्यामुळे, कायद्यांतील तरतुदींनुसार कुळ कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झाल्यानंतर विहित १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित जमिनीच्या हस्तांतरणास/व्यवहारास परवानगी देताना महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्याची तरतूद यापुढे लागू राहणार नाही.

​या अनुषंगाने, जिल्ह्यात कुळवहिवाट व शेतजमीन कायद्याच्या तरतुदींन्वये प्राप्त झालेल्या जमिनींबाबत प्रलंबित प्रकरणे तसेच पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

​या विशेष मोहिमेअंतर्गत संबंधित जमीनधारक/कुळ/लाभार्थी यांनी त्यांच्या जमिनीबाबतची आवश्यक कागदपत्रे व अर्ज तहसील कार्यालय कुडाळ यांचे कार्यालयात सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.

​सर्व संबंधित महसूल अधिकारी/कर्मचारी यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ मधील सुधारित तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व पात्र प्रकरणांमध्ये ४० पट नजराणा आकारणी करू नये, याची दक्षता घ्यावी.
​सदर विशेष मोहिमेचा सर्व संबंधित नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

ruchira top