Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

अन्नसुरक्षा नियम सर्व धर्मीयांसाठी समान लागू असावेत !

अन्नसुरक्षा नियम सर्व धर्मीयांसाठी समान लागू असावेत !


मंदिर महासंघाची मागणी : हिंदूंच्या सण-उत्सवांमधील महाप्रसाद व अन्नदान प्रक्रियेवरील एकतर्फी कारवाई बाबत नाराजी

मालवण | प्रतिनिधी : हिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद व अन्नदानाच्या प्रक्रियेवर अन्नसुरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या कथित एकतर्फी कारवाईबाबत तसेच कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीयांसाठी समानपणे लागू करण्याच्या मागणीसाठी मंदिर महासंघ महाराष्ट्राच्या वतीने मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी श्री गिरोबा देवस्थान नांदरुखचे मानकरी व सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण, श्री गिरोबा देवस्थान साळेलचे मानकरी व माजी सरपंच कमलाकर गावडे, मानकरी राजाराम दाजी गावडे, मंदिर महासंघाचे दीनानाथ गावडे, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेचे रुपेश साटम, श्री काळबादेवी मंदिर मालवणचे मानकरी संदीप धुरी, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगावचे मानकरी श्रीराम परब, धर्मप्रेमी महेंद्र पाताडे, श्री देवी भद्रकाली देवस्थान रेवंडीचे मानकरी विजय कांबळी तसेच सनातन संस्थेचे अनिकेत फाटक उपस्थित होते.
यावेळी इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे, श्री देव विठोबा देवस्थान देवबाग मालवण, श्री भद्रकाली देवस्थान रेवंडी आणि श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगाव यांच्या वतीनेही तहसीलदारांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top