Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषद सज्ज..

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषद सज्ज..

रस्ते, वाहतूक, पार्किंग, विद्युत व्यवस्था व अन्य सुविधा दृष्टीने नियोजन

नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न

मालवण | प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेने रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, पार्किंग, विसर्जन स्थळे, विद्युत व्यवस्था व सुरक्षेचे नियोजन केले आहे. याबाबत नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली.

यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, मंदार केणी, ललित चव्हाण, व्यापारी संघाचे पदाधिकारी नितीन वाळके, नितीन तायशेटये, बाळू अंधारी, संदेश कोयंडे उपस्थित होते. तसेच एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवून मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले. धोकादायक विद्युत तारा व वाहिन्यांचीही पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांचा पत्ता न लागल्यास संबंधित बॅनर छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी दिला.

बाजारपेठेतील गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फळविक्रेत्यांचे नियोजन करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार त्यांना अन्यत्र जागा दिली जाणार असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

रस्त्यांच्या दुतर्फा झाडी व गवत कापण्याची मोहीम सुरू असून १२ सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. डास प्रतिबंधक फवारणीही सुरू आहे. हायमास्ट व स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत.
शहरातील २२ गणेश विसर्जन स्थळांवर प्रकाश व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चिवला बीच, बंदर जेटी व दांडी बीच येथे जीवरक्षक तैनात राहतील. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने विसर्जन व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जन स्थळांवरील गाळ काढणे व पायऱ्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी अद्ययावत अग्निशमन वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे.

१३ ते २५ सप्टेंबरदरम्यान वाहतूक नियोजन
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १३ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सागरी महामार्गावर खासगी बस, ट्रक व अवजड वाहनांसाठी, नाट्यगृह आवारात खासगी वाहनांसाठी, तर बांगीवाडा येथे रिक्षा, टेम्पो व कारसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सारस्वत बँक परिसरात मोटारसायकल, मशीद गल्ली येथे सायकल, जेटी परिसरात अतिरिक्त रिक्षांसाठी व्यवस्था राहणार आहे.

राणे मेडिकल परिसरात सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, नेरूरकर गल्लीही सर्व वाहनांसाठी बंद राहील. धक्का जेटी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. भरड नाका ते स्टेट बँक या मार्गावर पार्किंग बंदी राहणार आहे.

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या, पाचव्या, सातव्या, अकराव्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशीला दुपारी ३ वाजल्यानंतर सोमवार पेठ रस्त्याने वाहने व एसटी बसेसचा प्रवेश बंद राहणार आहे. भरड येथील पार्किंग १३ ते २५ सप्टेंबरदरम्यान नागरिकांसाठी विनाशुल्क उपलब्ध राहणार आहे.

गणेशोत्सव आनंदात पार पाडण्यासाठी नागरिक, व्यापारी व रिक्षा व्यावसायिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ruchira top