३१ ऑगस्ट ||मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
मंगेश नलावडे | मालवण : मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक श्रावण जत्रोत्सव सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी देवस्थानच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता देवीच्या बारापाच मानकऱ्या कडून ओटी भरल्या नंतर आलेल्या भाविक भक्तांना ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजता देवीची इंगळ्यानी दृष्ट काढणे व ग्रामस्थ मानकऱ्यांची दृष्ट काढणे हा कार्यक्रम होणार आहे.श्रावण मधील या जत्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी तसेच ओटी भरण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सायंकाळी ७.३० पर्यंत देवीची ओटी भरण्याचा सोहळा सुरू राहणार आहे.
मालवण ग्रामदैवतांच्या प्रत्येक उत्सवांना धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. सातेरी देवी ही कोकणातील अनेक भागांत श्रद्धास्थान म्हणून पूजली जाते. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन असे आवाहन श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

मालवणची ग्रामदेवता श्री सातेरी देवीचा उद्या वार्षिक श्रावण जत्रोत्सव....!
