कै गजानन नारायण चव्हाण यांच्या स्मरणार्थ सौ. चंदना महेंद्र चव्हाण पुरस्कृत स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेला तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण | प्रतिनिधी : कै गजानन नारायण चव्हाण यांच्या स्मरणार्थ सौ. चंदना महेंद्र चव्हाण पुरस्कृत महिला सहभागातील खुली नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन हिवाळे गावडेवाडी गणेश मंदिर येथे नारळी पौर्णिमे निमित्त आयोजित करण्यात आली. हिवाळेमध्ये प्रथमच आयोजित या स्पर्धेला तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाली.
70 वर्षीय श्रीमती शारदा संभाजी कोंडवेकर या विजेत्या होऊन पैठणीची मानकरी ठरल्या. तर द्वीतीय क्रमांक स्वरा प्रशांत गावडे (सेमी पैठणी), तृतीय क्रमांक माया रामचंद्र गावडे (साडी), चौथा क्रमांक धनश्री धमेंद्र जंगम यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी 55 महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
शहरामध्ये होणाऱ्या या स्पर्धा ग्रामीण भागात होऊन त्यामधून आपल्या परिसरातील महिलांना आनंद मिळावा. यां उद्देशाने यां स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अशी भावना सौं. चंदना चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला सरपंच रघुनाथ धुरी, माजी सरपंच स्नेहलता चव्हाण, माजी सरपंचा प्रियंका आंगणे, मंडळाचे अध्यक्ष विलास चव्हाण, प्रशांत गावडे, सुरेंद्र गावडे, मदन गावडे, विलास गावडे, महेंद्र गावडे, संजय गावडे, संतोष गावडे, संतोष बेलवलकर, दत्ताराम चव्हाण, संदीप गावडे, माजी चेअरमन शिला निर्गुण, सूर्यकांत चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, चैत्रा चव्हाण, संचिता चव्हाण, तेजश्री दुखंडे, गौरी शेट्ये, दादा गावडे, पंच म्हणून तुषार आंगणे, गणेश आंगणे, अनुराज आंगणे, स्वप्नील चव्हाण, अक्षय आंगणे, वैभव आंगणे यांनी काम पाहिले.

हिवाळे गावडेवाडी येथील नारळ लढवणे स्पर्धेत 70 वर्षीय शारदा संभाजी कोंडवेकर विजेत्या होऊन पैठणीची मानकरी
