आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून 12 लाख निधी मंजूर
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर यांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथे १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर (निधी 12 लाख) जिल्हा नियोजन मधून प्रस्तावित करण्यात आला आहे.
चिंदर गावठणवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन मधून हे काम मंजूर आहे. याबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर यांनी आभार मानले आहेत.

