Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

महान येथे नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न..

महान येथे नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न..

युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर मित्र मंडळ आयोजित व शिवसेना पुरस्कृत स्पर्धा

पुरुष गटात विक्रांत घाडी, महिला गटात शर्मिला घाडी तर लहान गटात आयुष घाडी विजेते

मालवण | प्रतिनिधी :
युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर मित्र मंडळ आयोजित व शिवसेना पुरस्कृत भव्य नारळ लढविणे स्पर्धा महान येथील महापुरुष मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पुरुष, महिला आणि लहान गट अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेला स्पर्धक तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चुरशीच्या लढतीनंतर प्रत्येक गटातील विजेत्यांची निवड करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.


नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे आयोजन युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

स्पर्धेतील पुरुष गटात विक्रांत घाडी यांनी प्रथम क्रमांक, तर अशोक जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. महिला गटात शर्मिला घाडी प्रथम, तर उल्का नेरकर द्वितीय ठरल्या. लहान गटात आयुष घाडी यांनी प्रथम, तर समर्थ साळुंखे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. पुरुष व महिला गटातील प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी ३००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २००१ रुपये, तर लहान गटातील प्रथम क्रमांकासाठी १००१ रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी ५०१ रुपये अशी पारितोषिके मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना प्रदान करण्यात आली.


या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, माजी सभापती सुधीर साळसकर, मंगेश साळसकर, महान गावचे सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद जाधव, सागर शिंदे, महिला सदस्य चैताली शिंदे, अंजली हळवे, माजी सरपंच सुहास साळुंखे, मदन घाडी, महान गावचे शिवसेना शाखाप्रमुख श्यामा घाडी, रवींद्र साळसकर, अशोक जाधव, रेजन घाडी, संदीप राणे, निळकंठ घाडी, संदीप शिंदे, दिनेश घाडी, अक्षय जाधव, गौरव राणे, प्रशांत साळुंखे, सुरेश घाडी, राजू घाडी, दीपक घाडी, सुरेश चव्हाण, सोनू शिंदे, तात्या नेरकर, विद्या नेरकर, बाबू नेरकर, चेतन साळसकर, शुभम हळवे, ओमकार शिंदे, शुभम शिंदे, मंदार शिंदे, प्रणव शिंदे, विक्रांत घाडी, आदित्य घाडी, रोहन घाडी, नीता चव्हाण, वर्षा शिंदे, शर्मिला घाडी, वैष्णवी घाडी, रसिका नेरकर आणि कोमल गावडे यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी संग्राम साळसकर मित्र मंडळाचे कौतुक केले. पारंपरिक नारळ लढविण्याच्या खेळाला स्पर्धात्मक स्वरूप देत स्थानिक संस्कृती व परंपरा जपण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top