आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चार सोलर हायमास्ट मंजूर :
ग्रामस्थ व ग्रामपंचायत त्रिंबकच्या वतीने सरपंच किशोर त्रिंबककर यांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाकडून त्रिंबक गावातील सम्राट अशोक नगर व चर्मकारवाडी येथे प्रत्येकी दोन सोलर हायमास्ट बसविण्यात आले. ते कार्यान्वित होऊन परिसर प्रकाशमान झाला आहे.
या हायमास्ट टॉवरमुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठा दिलासा मिळणार आहे. या कामाबद्दल परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने त्रिंबक ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर त्रिंबककर यांनी आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच समाजकल्याण विभागाचे आभार मानले आहेत.

त्रिंबक येथील सोलर हायमास्ट कार्यान्वित होऊन परिसर प्रकाशमान
