पंकज सादये विजेते : दीप केरकर उपविजेते : अनिकेत जांभळे तृतीय, रुद्र राऊळ चतुर्थ
बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व सोनू खांदारे पुरस्कृत स्पर्धेचे भव्य आयोजन
मालवण प्रतिनिधी : बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे पुरस्कृत स्पर्धेचे राजकोट बॉईज, राजकोट मित्रमंडळाचे भव्य आयोजतील भव्य खेळी नारळ फोडणे स्पर्धेचा थरार राजकोट येथे रात्री उशिरा पर्यंत रंगला. स्पर्धेत पंकज सादये विजेते तर दीप केरकर उपविजेते ठरले. तसेच अनिकेत जांभळे तृतीय, रुद्र राऊळ चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

विजेत्यांसाठी बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे यांच्या सौजन्याने आकर्षक बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली. पुरुष गटातील विजेत्यास ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास २५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय अन्य विविध आकर्षक बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर करण्यात आला.

स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य तथा युवासेना नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकोट किल्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या स्पर्धेला महिला व पुरुष स्पर्धकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, युवा उद्योजक सोनू खांदारे, सुनील खांदारे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, बबन रेडकर, नंदू देसाई, अक्षय मालवणकर, परितोष बापर्डेकर, हिमांशु बापर्डेकर, नागेश परब, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, अनिता फर्नांडिस, मंदा जोशी नगरसेविका महानंदा खानोलकर, विजू कांदळकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, यश कवठकर, दीपक कुडाळकर, विशाल मोडक, अथर्व काळसेकर, सागर खराडे, नागेश परब, संदीप गावकर, पराग परब, मंदार परब, कौशल जोशी, रोहित कवठकर, अथर्व चिंदरकर यांसह राजापूर जि.प. सदस्य प्रकाश पोळेकर, प्रतीक मठकर, पं.स. सदस्य अविनाश पराडकर, सुभाष गुरव, अजित नारकर, भरत लाड, जितेंद्र खांबकर, संदीप बारसकर, सुरेश येनारकर, प्रसाद गुरव, सुभाष बापारकर, शाम वाक्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी, राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.
▪️अमित खोत, मालवण

