Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

महायुतीच्या वतीने भव्य दिव्य बक्षीसांची महिला नारळ लढविणे स्पर्धा

महायुतीच्या वतीने भव्य दिव्य बक्षीसांची महिला नारळ लढविणे स्पर्धा


सोन्याची नथ, पैठणीसह फ्रिज, वॉशिंग मशीन, चांदीचा करंडा, छल्ला, मिक्सरसह आकर्षक बक्षिसांची लयलूट

आमदार निलेश राणे यांसह महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती


अमित खोत | मालवण : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवण बंदर जेटी येथे नारळी पौर्णिमेनिमित्त महायुतीच्या वतीने मोठ्या उत्साहात महिला सहभागातील नारळ लढविणे स्पर्धा भव्य स्वरूपात रंगणार आहे. गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.

महिलांसाठी विशेष आकर्षण असलेल्या या स्पर्धेत यंदा मोठ्या बक्षिसांची लयलूट असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि फ्रिज असे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास वॉशिंग मशीन, तर तृतीय क्रमांक चांदीचा कुंकवाचा करंडा, चतुर्थ क्रमांक चांदीचा छल्ला, पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी मिक्सर देण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग ठरलेल्या या नारळ लढविणे स्पर्धेला यंदा आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक भव्य स्वरूप देण्यात आले आहे. भाजप-शिवसेना यांच्या वतीने मोठ्या बक्षिसांचा वर्षाव असलेली ही स्पर्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून शिवसेना-भाजप महायुतीच्या एकत्रित आयोजनातून होणार आहे.
या स्पर्धेला खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती सह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा सुरू होण्याच्या एक तास अगोदर आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी भाजप महिला शहराध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर ९४०४३४४३२२ तसेच शिवसेना कुडाळ-मालवण संघटक तथा मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण ९४०४६८९३१६ यांच्याशी संपर्क साधावा.

नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला पारंपरिक रंगत देणाऱ्या या स्पर्धेत महिलांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top