सतीश आचरेकर मित्र मंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे आयोजन
विजेत्यांवर लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव होणार
मालवण | प्रतिनिधी : नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटीवर गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता नारळ लढविण्याच्या भव्य स्पर्धांचा महासंगम रंगणार आहे. सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची भव्य दिव्य बक्षिस रक्कमेची नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तब्बल १ लाख १ हजार १११ रुपये रोख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास ५१ हजार १११ रुपये व चषक, तृतीय क्रमांकास २१ हजार १११ रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकास ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा प्रवेश शुल्क 2,000 असणार आहे. 24 संघामध्ये ही स्पर्धा होणार आहे. श्रावणी पाटील स्पर्धेचे अँकरिंग करणार आहे. स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी आनंद आचरेकर 9325201375, मॉन्टी नार्वेकर 8429369978, संजय घरत 7798998949 यांच्याकडे द्यावीत.
मालवणच्या पारंपरिक नारळ लढविण्याच्या खेळाला नारळी पौर्णिमेच्या उत्साहात भव्यदिव्य स्पर्धेची जोड मिळणार असून महाराष्ट्रातील नारळ लढवणे स्पर्धक व प्रेक्षक यांचे लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे. मालवणी संस्कृती, परंपरा आणि उत्साहाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
▪️अमित खोत | मालवण

महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची भव्य दिव्य नारळ लढवणे स्पर्धा
