Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

'शिरगांवकर बीच रिसॉर्ट' उद्घाटन सोहळा विशेष...

'शिरगांवकर बीच रिसॉर्ट' उद्घाटन सोहळा विशेष...

▪️'मालवणच्या पर्यटन समृद्धीत भव्य आलिशान वास्तूची झळाळी

▪️ 'शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ पर्यटकांच्या सेवेत

मालवणच्या पर्यटन नगरीत दिमाखदार आणि आलिशान वास्तूची झळाळी प्राप्त झाली आहे. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आधुनिक वास्तुरचना, प्रशस्त सुविधा, आलिशान निवासव्यवस्था आणि आपुलकीच्या आदरातिथ्याचा संगम साधत ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे. ही केवळ एक नवी हॉटेल वास्तू नाही; तर एका कुटुंबाने चार पिढ्यांच्या मेहनतीतून, जिद्दीने आणि एकमेकांच्या साथीने उभा केलेल्या व्यवसायाच्या प्रवासाचे हे यशस्वी पर्व आहे.

शिरगावकर बीच रिसॉर्ट चे सर्वेसर्वा उद्योजक संतोष मधुकर शिरगांवकर यांनी भव्य रिसॉर्टच्या रूपाने साकारलेले स्वप्न एका दिवसात उभे राहिलेले नाही. त्यामागे उभा आहे अथक मेहनतीचा प्रवास आणि शिरगांवकर कुटुंबियांनी ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास.


आजी माणिक शिरगांवकर यांच्यापासून सुरू झालेला हॉटेल व्यवसायाचा प्रवास, त्यातून निर्माण झालेला ग्राहकांचा विश्वास, पुढच्या पिढ्यांनी जपलेली परंपरा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मेहनतीची जोड. मालवणकरांच्या बोली भाषेतील 'माणक्याच्या हॉटेल’पासून सुरु झालेली ही विश्वासाची कहाणी ठरली आहे.

आजी माणिक शिरगांवकर यांच्या मेहनतीतून हॉटेल व्यवसायाचे रोपटे रोवले गेले. वडील मधुकर शिरगांवकर यांच्या कष्टाने, गुणवत्तेने आणि ग्राहकांशी जपलेल्या आपुलकीच्या नात्याने ‘माणक्याचे हॉटेल’ हे ग्राहकांच्या विश्वासाचे हक्काचे ठिकाण बनले. संपूर्ण शिरगावकर कुटुंबीयांनी ही ओळख अभिमानाने जपली आहे.


हॉटेल व्यवसाय हा केवळ खाद्यपदार्थ आणि निवासाची सेवा देणारा व्यवसाय नसून, ग्राहकाला आपलेपणाची अनुभूती देणारा व्यवसाय आहे, हीच शिकवण आजींच्या मेहनत आणि यशस्वी प्रवासातून पुढच्या पिढ्यांना मिळाली. मेहनत, प्रामाणिकपणा, दर्जा आणि ग्राहकांचे समाधान या चार गोष्टींची शिदोरी घेऊन शिरगांवकर कुटुंबाने हा व्यवसाय पुढे नेला.
आजींच्या सोबत आणि नंतर वडील, आई, भाऊ, बहीण, काका-काकी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी या व्यवसायाच्या प्रवासात योगदान दिले. परिश्रम, मेहनत, खाद्यपदार्थांची गुणवत्ता यासोबतच ग्राहकांचा विश्वास कायम जपला. त्यामुळे हॉटेल व्यवसाय हा एका व्यक्तीचा न राहता संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाचा आणि एकजुटीचा प्रवास बनला.


२०१४ : ‘हॉटेल शिरगांवकर’मधून नव्या पर्वाची सुरुवात

या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला तो २०१४ सालचा. संतोष शिरगावकर यांनी कुटुंबाच्या सोबतीने मालवण बंदर जेटी मुख्य नाका येथे ‘हॉटेल शिरगांवकर’ या नव्या दालनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली गेली. अस्सल मालवणी चवीसोबत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची व्यवस्था आणि ग्राहकांच्या आवडीनुसार सेवा देण्यावर भर देण्यात आला. मालवणी खाद्यसंस्कृतीची अस्सल चव आणि शिरगांवकर कुटुंबाची आपुलकी यामुळे हॉटेलने अल्पावधीतच पर्यटकांच्या, ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.
‘हॉटेल शिरगांवकर’मधील प्रत्येक पदार्थाची चव ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळणारी ठरली. एकदा आलेला ग्राहक पुन्हा यावा आणि त्याने इतरांनाही या ठिकाणाची शिफारस करावी, हा विश्वास या प्रवासातून निर्माण झाला. याच ग्राहकांच्या प्रेमातून आणि विश्वासातून पुढील मोठ्या स्वप्नाला दिशा मिळाली.

शिरगावकर बीच रिसॉर्ट आलिशान रिसॉर्ट....


२०१४ मध्ये सुरू झालेल्या ‘हॉटेल शिरगांवकर’च्या प्रवासाने पुढे मोठे स्वप्न पाहण्याचे बळ दिले. मालवणमध्ये देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या, पर्यटन क्षेत्राचा विस्तार आणि दर्जेदार निवासव्यवस्थेची वाढती गरज लक्षात घेऊन शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ची संकल्पना आकाराला आली.
मालवण बंदर जेटी मार्गालगत, डॉ. बल्लव रोड, मेढा-मालवण येथे ही भव्य वास्तू साकारण्यात आली. आधुनिकतेचा स्वीकार करताना शिरगांवकर कुटुंबाने आपल्या व्यवसायाची मूळ ओळख असलेली आपुलकी, विश्वास आणि दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
आज हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून, ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’च्या रूपाने शिरगांवकर कुटुंबाच्या व्यवसाय प्रवासाला नवी आणि दिमाखदार ओळख मिळाली आहे.

चार पिढ्यांची साथ... स्वप्नपूर्तीचा प्रवास

‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ची सर्वात मोठी ओळख म्हणजे चार पिढ्यांच्या सहभागातून साकारलेला हा प्रवास.
आजी माणिक शिरगांवकर यांनी सुरू केलेला हॉटेल व्यवसाय पुढे आई-वडिलांनी मेहनतीने वाढवला. भाऊ-बहीण, काका-काकी आणि संपूर्ण कुटुंबाने या वाटचालीला हातभार लावला. आज या प्रवासात पुढची पिढी म्हणजे मुलाचाही सहभाग जोडला गेला आहे.
म्हणूनच ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ ही केवळ व्यवसायाचे नवे पर्व नसून, आजीने लावलेल्या व्यवसायाच्या रोपट्याचे चार पिढ्यांनी संगोपन करून उभे केलेले भव्य वटवृक्षाचे रूप आहे.
या वास्तूच्या प्रत्येक विटेमागे कुटुंबातील सदस्यांची मेहनत, त्याग आणि योगदान दडलेले आहे. त्यामुळे या वास्तूचा आनंद हा संपूर्ण शिरगांवकर कुटुंबासाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे.

आलिशान वास्तू, आधुनिक सुविधा आणि दर्जेदार निवासव्यवस्था

पर्यटकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’मध्ये आधुनिक आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रिसॉर्टमध्ये २२ आलिशान रूम्स, तसेच बाथटबसह दोन विशेष सुइट्स उपलब्ध आहेत. प्रशस्त खोल्या, आकर्षक अंतर्गत सजावट आणि आरामदायी वातावरणामुळे पर्यटकांना मुक्कामाचा सुखद अनुभव मिळावा, याचा दर्जा राखण्यात आला आहे. रिसॉर्टमध्ये रेस्टॉरंटची सुविधा असून, पर्यटकांना निवासासोबत उत्तम खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार आहे. विविध कार्यक्रम, कौटुंबिक समारंभ आणि छोट्या-मोठ्या सोहळ्यांसाठी ४० ते ५० व्यक्तींच्या क्षमतेचा प्रशस्त बँक्वेट हॉल उपलब्ध आहे.
यासोबतच जनरेटर बॅकअप, वाय-फाय, लिफ्ट आणि प्रशस्त पार्किंग यांसारख्या आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या आरामाचा आणि सोयीचा सर्वांगीण विचार करून रिसॉर्टची रचना करण्यात आली आहे.

पर्यटकांना दर्जेदार आदरातिथ्य

मालवण हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला, मालवणी खाद्यसंस्कृती आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक मालवणमध्ये दाखल होतात.
या पर्यटन वाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना दर्जेदार निवास, आधुनिक सुविधा, आलिशान वातावरण आणि आपुलकीचे आदरातिथ्य मिळावे, या उद्देशाने ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ साकारण्यात आले आहे. पर्यटक मालवणमध्ये केवळ फिरण्यासाठी नव्हे, तर सुखद आठवणी घेऊन परत जावेत, हा या रिसॉर्टमागील मुख्य प्रयत्न आहे. शिरगांवकर कुटुंबाचा हॉटेल व्यवसायाचा प्रवास पाहिला तर एक गोष्ट सातत्याने दिसून येते ग्राहकांचा विश्वास आणि आपुलकी. ‘माणक्याचे हॉटेल’पासून ‘हॉटेल शिरगांवकर’ आणि आता ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’पर्यंतचा प्रवास बदलत्या काळानुसार व्यवसायात आधुनिकता आणणारा असला, तरी ग्राहकांशी असलेले नाते आणि दर्जेदार सेवा देण्याची भूमिका कायम ठेवणारा आहे.
याच परंपरेतून मालवणमध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार आदरातिथ्य देण्याचा प्रयत्न ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’च्या माध्यमातून केला जाणार आहे.

आजीच्या कष्टातून सुरू झालेला प्रवास...

‘माणक्याचे हॉटेल’पासून सुरू झालेली ही कहाणी ‘हॉटेल शिरगांवकर’च्या माध्यमातून नव्या टप्प्यावर पोहोचली आणि आता ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’च्या रूपाने चार पिढ्यांच्या मेहनतीचे उत्तुंग शिखर सर करणारी ठरली आहे. आजीचा आशीर्वाद, आई-वडिलांची मेहनत, भाऊ-बहीण, काका-काकी आणि संपूर्ण कुटुंबाची साथ आणि पुढच्या पिढीची नवी उमेद यांचा सुंदर संगम या वास्तूत पाहायला मिळतो. म्हणूनच ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ची ओळख केवळ आलिशान हॉटेल म्हणून नव्हे, तर कुटुंबाच्या चार पिढ्यांचे परिश्रम, संस्कार, मेहनत आणि स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी म्हणूनही कायम राहणार आहे.

▪️शब्दांकन : अमित खोत | मालवण

ruchira top